संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांना पुन्हा ईडीचे समन्स

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवून उद्या चौकशीसाठी बोलावले आहे. दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने समन्स पाठवले आहे. याआधी अनिल परब यांना 15 जून रोजी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र परब शिर्डीला असल्याने ते पोहोचले नव्हते.
अनिल परब यांच्या दोन निवासस्थानांसह सुमारे 7 ठिकाणी ईडीने छापा टाकला होता. ईडीने अनिल परब यांच्या विरोधात मनीलाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. कोस्टल रेग्युलेटरी झोन नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या रिसॉर्टच्या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला. उद्या अनिल परब ईडी समोर हजर राहतात का हे पाहणे महत्वाचे आहे. आधी महाविकास आघाडीतील 2 नेते नवाब मलिक आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही मनीलाँड्रिंग प्रकरणात अटक झाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami