संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

शिवसेनेच्या महिला संघटक संध्या वढावकर शिंदे गटात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : कालपर्यंत ठाकरे गटासोबत असणाऱ्या ईशान्य मुंबई महिला संघटक संध्या वढावकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या पुढाकाराने संध्या वढावकर शिंदे गटात सामील झाल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या संध्या वढावकर या शिवसेनेच्या जेष्ठ महिला कार्यकर्त्या आहेत.

दरम्यान, सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली. त्यांना पक्षाचे उपनेतेपद देण्यात आले. यावर आपली नाराजी त्यांनी व्यक्त केली. ३७ वर्ष शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे अंधारे यांना मिळालेलय पदाबाबत आपल्याला वाईट वाटले असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी संध्या वढावकर यांनी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका लागला आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी नक्कीच हे आव्हान वाढणार आहे. मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे हे सध्या महाराष्ट्रातील विविध भागात जावून दौरा करत आहेत. यावेळी अनेकजण त्यांना आपला पाठिंबा दर्शवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन भाजप मुंबई महापालिका निवडणुकीत उतरु शकते. त्यामुळे ठाकरे गटाला येथे मोठा फटका बसू शकतो, असेही बोलले जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami