मुंबई: – काल बुधवारच्या घसरणीनंतर आज पुन्हा एकदा शेअर बाजार वधारला आहे. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्समध्ये 488 अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 162 अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये आज 0.94 टक्क्याची वाढ होऊन तो 52,311 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 1.06 टक्क्यांची वाढ होऊन तो 15,576 अंकावर पोहोचला.
आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 150 अंकांनी वधारत 51,972.75 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 38 अंकांची उसळला. निफ्टी 15,451.55 च्या पातळीवर खुला झाला होता. बुधवारी शेअर बाजारात घसरण होता. त्यानंतर आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली.