संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 16 August 2022

शेतकर्‍यांना तात्काळ मदत करा! अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे सध्या चांगलेच अ‍ॅक्शन मोडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. नवे सरकार राज्यात अस्तित्वात आले, त्याचवेळी राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक भागात पूरस्थिती होती. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठं नुकसान झाले आहे. अजित पवारांनी तातडीने विदर्भ, मराठवाड्याचा रॅपिड फायर दौरा करत या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज लगेचच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शेतकर्‍यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी व पूरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते व विधीमंडळ सदस्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री येथे भेट घेऊन निवेदन दिले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार अनिल पाटील,आमदार दत्तामामा भरणे, आमदार सुनील भुसारा आदी नेते शिष्टमंडळात सहभागी झाले होते, अशी माहिती अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami