संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

श्रीलंकेचा क्रिकेटपटू पेट्रोलसाठी २ दिवस रांगेत उभा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीलंका: श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती दिवसागणिक भयावह होत चालली आहे. श्रीलंकेचा क्रिकेटर चमिका करुणारत्ने याला पेट्रोल भरण्यासाठी तब्बल दोन दिवस रांगेत उभे राहावे लागले होते. देशात पेट्रोलच्या कमतरतेमुळे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे तो त्याच्या नियमित प्रॅक्टिस सेशनला हजेरी लावू शकत नाही. करुणारत्ने याने या परिस्थितीवर भाष्य केले आहे.

तो म्हणतो, मी भाग्यवान होतो की दोन दिवस रांगेत थांबल्यानंतर मला पेट्रोल मिळाले, कारण देशात इंधनाचे संकट आहे. मला क्रिकेटच्या सरावासाठीही जाता येत नाही.मला फक्त १० हजाराचे पेट्रोल मिळू शकले, जे फक्त २-३ दिवस टिकेल. ऑगस्टमध्ये होणाऱ्या आशिया चषकचा श्रीलंका यजमान आहे. यासोबतच यावर्षी लंका प्रीमियर लीगही होणार आहे. याचा परिणाम आर्थिक आणि इंधनाच्या संकटामुळे होऊ शकतो.

श्रीलंकेतील नागरिकांना आर्थिक संकटाचा मोठा सामना करावा लागत आहे. देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेले श्रीलंकेचे राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami