संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीलंका : आर्थिक आणीबाणी सामना करत असणाऱ्या श्रीलंकेला रनिल विक्रमसिंघे हे नवे राष्ट्रपती म्हणून मिळाले आहे. पोस्टल बॅलेटद्वारे झालेल्या मतदानात 134 खासदारांनी त्यांच्या बाजूने मतदान केले. तसेच सध्या रानिल विक्रमसिंघे हे काळजीवाहू अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी देखील विक्रमसिंघे 6 वेळा पंतप्रधान राहिले होते. तर याआधी त्यांनी राजकीय गोंधळात पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. तसेच राजपक्षे देशातून पळून गेल्यानंतर गोटाबाया काळजीवाहू अध्यक्ष म्हणून काम करत होते.

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानले जाणारे साजिथ प्रेमदासा शर्यतीत बाहेर पडल्यानंतर राष्ट्रपतीपदासाठी रानिल विक्रमसिंघे विरुद्ध डलास अलाहाप्पेरुमा यांच्यात संघर्ष होता. रानिल विक्रमसिंघे यांच्या विरुद्ध एसएलपीपी खासदार डलास अलाहाप्पेरुमा हे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार होते.रनिल यांनी ७० च्या दशकात राजकारणात प्रवेश केला होता. १९७७ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. १९९३ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान होण्यापूर्वी रानिल यांनी उपपरराष्ट्र मंत्री, युवा आणि रोजगार मंत्री यासह इतर अनेक मंत्रालये सांभाळली आहेत.

श्रीलंकेत सध्या अनागोंदीचे वातावरण आहे. महागाई, इंधन तुटवडा, बेरोजगारी, औषधांचा तुटवडा यामुळे नागरिक संतप्त होऊन आंदोलन करत आहे. या आंदोलकांना रानिल विक्रमसिंघे आवडत नाहीत कारण ते त्यांना गोटाबाया राजपक्षे यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे नव्या राष्ट्रपतींना नागरिकांना विश्वासात घेऊन आर्थिक संकटात सापडलेल्या देशाला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर उभे आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami