संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 17 August 2022

संगमेश्वरात बिबट्याने घरात शिरूनकेलेल्या हल्यात महिला गंभीर जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

देवरुख : बिबट्याने घरात शिरून महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यात घडली असल्याचे समोर आले आहे. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान, प्रसंगावधान राखून ग्रामस्थांनी महिलेला बाहेर काढल्याने जिवितहानी टळली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमेश्वर तालुक्यातील नजीकच्या वाशी सहाणेची वाडी येथे सोमवारी सकाळी बिबट्याने थेट घरात शिरून महिलेवर हल्ला केला असल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. प्रसंगावधान राखून ग्रामस्थांनी त्या महिलेला बाहेर काढले. अन् बिबट्या घरातच अडकला. जखमी महिलेला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून जंगलीप्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे. मात्र आता प्राण्यांकडून नागरिकांवर थेट घरात शिरून हल्ले होत असल्याच्या गंभीर घटनांमध्ये देखील वाढ होत असल्याचे वेळोवेळी समोर येत आहे. त्यामुळे आता वनविभागाने यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज येथील काही ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami