पुणे- माजी वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी क्लिन चिट दिले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर जोरदार टीका करत म्हटले की, राठोडांवर तत्कालीन विरोधी पक्षाने राठोडांवर खोटे आरोप केले. हे आता फडणवीस यांनी मान्य करुन टिव्हीवरुन जाहिररित्या हात जोडून त्यांची माफी मागावी, आणि पूजा चव्हाणच्या घरी जावून या प्रकरणाचा तपास आम्ही करु तिला न्याय देवू असे सांगण्याचे आव्हानही सुळे यांनी दिले आहे.
७ फेब्रुवारी २०२१ ला पूजा चव्हाणने पुण्यात राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यांनी हे प्रकरण लावून धरले होते. फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीका केली. २८ फेब्रुवारी संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.या प्रकरणी आता पोलिसांनी माजी वन मंत्री संजय राठोड यांना क्लीन चिट दिली आहे.संजय राठोड यांना क्लीन चिट दिल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला असुन की,आता हाच प्रश्न तुम्ही पुणे पोलिस आयुक्तांना जाऊन विचारावा, मी माझी लढाई अजून ही लढत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.