संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

संभाजीराजेेंना शिवसेनेकडून
पक्ष प्रवेशासाठी निमंत्रण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीची लगीनघाई सुरू असतानाच सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंनी उमेदवारी जाहीर केल्याने निवडणुकीची राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने संभाजीराजेंची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उद्या दुपारी 12 वाजता ‘वर्षा’ वर या. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उमेदवारी जाहीर करु, असे आमंत्रणच संभाजीराजेेंना दिले आहे. त्यामुळे संभाजीराजे नेमकी काय भूमिका घेतात याकडे आता सर्वार्ंचे लक्ष लागले आहे. आज दुपारी शिवसेना सचिव अनिल देसाई, मिलिंद नार्वेेकर आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हॉटेल ट्रायडेेंट येथे संभाजीराजे यांची भेट घेत चर्चा केली. या बैठकीनंतर शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ या निवासस्थानी रवाना झाले. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संभाजीराजेेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर उमेदवारी जाहीर करु. उद्या दुपारी 12 वाजता ‘वर्षा’वर या, असे निमंत्रण संभाजीराजेेंना धाडले आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा सुटणार की अधिकच वाढणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami