संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

संभाजी महाराजांच्या स्मारक होणार! फडणवीसांचे स्पष्टीकरण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. वढू बुद्रूक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या आघाडी सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावत संभाजी महाराजांच्या स्मारकाला स्थगिती देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वढू येथील संभाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भातील कामांना आमच्या सरकारने स्थगिती दिल्याचा आरोप केला आहे. दादांसारख्या माणसाने असा आरोप करताना फाईलवर काय लिहिले आहे हे पाहायला पाहिजे होत. मी स्वत:च्या हस्ताक्षरात फाईलवर लिहिले आहे की, या कामाला स्थगिती देणे योग्य होणार नाही. उलट या संदर्भात काय काय कामे घेतली आहेत. त्यासंदर्भातील सादरीकरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर करावे. त्यात काही कामे राहिली असतील तर त्याचाही समावेश करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील वढू येथील संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी तयार करण्यात आलेल्या २६५ कोटी रुपयांचा आराखडा शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami