नवी दिल्ली – संसदेच्या दोन्ही सभागृहांचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. लोकसभा सचिवालयाने प्रसिद्धीपत्रक जारी करत अधिवेशनाची तारीख जाहीर केली आहे. गेल्या वर्षीचे पावसाळी अधिवेशन गदारोळात संपले होते. विरोधी पक्षांनी पेगॅसस, हेरगिरी, शेतकर्यांचा विरोध आणि तेलाच्या किमतीत झालेली वाढ यावर चर्चा करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली होती. जी प्रत्यक्षात आली नाही आणि दोन्ही सभागृहात विरोधकांनी जोरदार राडा केला होता. आता या अधिवेशनात विरोधी पक्ष कोणकोणत्या मुद्यावरून केंद्र सरकारला घेरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच अग्निपथ योजनेवरूनही हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.