संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

सत्तांतरानंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना झुकते माप

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- सत्तांतरानंतर प्रत्येक सरकार प्रशासनाला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांची नेमून करीत असते. महाराष्ट्रातही सत्तांतर झाल्यानंतर प्रशासनावर आपला वचक ठेवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना झुकते माप द्यायला सुरुवात केली आहे. तर मातोश्रीच्या जवळच्या अधिकाऱ्यांना दूर ठेवले जात आहेत.

शिंदे -फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी मागील महाविकास आघाडीचे अनेक निर्णय बदलण्याचा सपाट चालवला आहे. त्याच बरोबर प्रशासनात सुद्धा आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करायला सुरुवात केली आहे . ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांडगे यांची कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी नित्यक्ति करण्यात आली आहे. तर मुख्याधिकारी आज्जीज शेख यांची उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचीही बदली करण्यात आली आहे. फडणवीस यांच्या अगदी जवळचे असलेले श्रीकर परदेशी यांची फडणवीसांच्या कार्यालयाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे,. नाशिक महापालिकेचे आयुक्त रमेश पवार ,औरंगाबाद महापालिकेचे प्रशासकस्तिककुमार पांडे यांचीही बदली करण्यात आली आहे.  पांडे मातोश्रीच्या निकटचे अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांना दूर करण्यात आले असून त्यांना अजून नवी नियुक्तीही देण्यात आलेली आंही . मातोश्रीच्या जवळच्या आणखी काही अधिकाऱ्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.
आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami