‘सर्व परीक्षा MPSC मार्फतच घ्या,’ आरोग्य विभागातील परीक्षा गोंधळावरून रोहित पवार संतापले

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – सहा हजार पदांसाठी आयोजित केलेली आरोग्य विभागाची परीक्षा आयत्या वेळेला रद्द करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा २४ ऑक्टोबर रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. मात्र यावेळी ही गोंधळ उडाल्याने पुढील परीक्षा एमपीएससी मार्फतच घेण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी नेते आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे त्यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.

या सर्व प्रकरणावर रोहित पवार यांनी ट्वीट केलं असून परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही असं म्हटलं आहे.

“एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिलोकेट करावेत,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

तसंच कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढं ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी. शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा,” अशी मागणीही मांडली आहे.

“उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. म्हणून कृपया येत्या काळात सर्व परीक्षा MPSC मार्फतच घेण्यात याव्यात, ही कळकळीची विनंती,” असल्याचं ते म्हणाले आहेत.

आरोग्य विभागाच्या सहा हजार पदांसाठी राज्यभरातून तीन ते चार लाख उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या सर्व उमेदवारांना या नियोजनातील गोंधळाचा फटका बसला आहे. यापूर्वी आरोग्य विभागाची परीक्षा नियोजनातील गोंधळामुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करून संबंधित ‘न्यासा’ कंपनीच्या कामाबाबत नाराजी प्रकट के ली होती. त्यानंतरही याच कं पनीद्वारे २४ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार २४ ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करून दिल्यानंतर नियोजनात झालेला नवा गोंधळ लक्षात येऊन उमेदवार चक्रावून गेले आहेत.

अनेक विद्यार्थ्यांनी दोन पदांसाठी अर्ज केला असल्याने संबंधित विद्यार्थ्यांला एकाच परीक्षा केंद्रावर परीक्षा देणे शक्य असताना दोन सत्रांतील परीक्षासाठी दोन वेगळ्या जिल्ह्य़ांतील परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे दोन परीक्षांसाठीचे शुल्क भरलेल्या उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.

Close Bitnami banner
Bitnami