सांगली – सकाळी जॉगिंगला जाणाऱ्या महिलांची छेडछाड करण्याचे प्रकार सांगली शहरात वाढलेले आहेत. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने , आज जॉगिंगला आलेल्या उपजिल्हाधिकारी महिलेची छेडछाड करण्यात आली. पण तिने प्रतिकार करताच तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला . यात उप जिल्हाधिकारी हर्षलता गेडाम जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.
आज सकाळी ७ च्या सुमारास उप जिल्हाधिकारी हेमलता गेडाम या सांगलीतील राजमती मैदानावर जॉगिंग करीत होत्या . याच दरम्यान मोटार सायकल वरून दोन रोड रोमियो तिथे आले. त्यातील एकाने त्यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांच्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. मात्र हेमलता गेडाम यांनी त्या इसमाला लाथ मारून खाली पाडले. पण त्याच वेळी त्यांच्या सोबत असलेल्या दुसऱ्या इसमाने गेडाम यांच्यावर चाकूने हल्ला केला .या हल्ल्यात त्यांच्या हातावर आणि मनगटावर वार झाले आहेत. दरम्यान त्यांचा आरडा ओरडा एकूण तेथे जॉगिंगला आलेल्या लोकांनी धाव घेतली. तोवर हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर गेडाम याना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे मागील १७ तारखेला सुद्धा त्यांची छेडछाड करण्यात आली होती . आणि त्या प्रकरणाची पोलिसांकडे फिर्यादी नोंदवण्यात आली होती . या ठिकाणी सकाळी जॉगिंगला येणाऱ्या महिलांची नेहमीच छेडछाड केली जाते . मात्र इथल्या रोड रोमायचं पोलिसनकडून कोणत्याही प्रकारे बंदोबस्त करण्यात आला नाही त्यामुळे आज उप जिल्हाधिकारी या सारख्या मोठ्या प्रशासकीय अधिकारी महिलेची छेडछाड करण्यात आली त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.