संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 13 August 2022

साताऱ्यातील तरुण केळवली धबधब्‍यात बेपत्ता

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा – एक महाविद्यालयीन तरुण काल संध्याकाळी केळवली येथील धबधबा पाहण्‍यासाठी गेलेला असताना पाण्यात बेपत्ता झाल्याची घटना घडली. राहुल सुभाष माने, असे या १७ वर्षीय तरुणाचे नाव असून तो इयत्ता बारावीत शिकत होता. स्‍थानिक नागरिक, ट्रेकर्स, वनकर्मचारी आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल त्याच्या दोन मित्रांसोबत केळवली धबधबा परिसरात गेला होता. तिथे पाण्यात उतरल्यानंतर काही वेळाने तो दिसेनासा झाला. मित्रांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. मग त्यांनी त्याच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने पोलीस स्थानक गाठले. या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांचे पथक धबधबा परिसरात दाखल झाले. राहुलचा शोध घेण्यास सुरुवात झाली, परंतु अंधार पडल्‍याने शोध थांबविण्‍यात आला होता. आज सकाळी सहा वाजल्‍यापासून स्‍थानिक नागरिक, ट्रेकर्स, वनकर्मचारी आणि पोलिसांनी पुन्हा शोध घेण्‍यास सुरुवात केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami