भोपाळ- मध्यप्रदेशची राजधानी भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोन करून एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. या इसमाने आपण अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल कास्करचा माणूस असल्याचं सांगितलं आहे. साध्वी यांनी फोनवरच हिंमत असेल तर समोर या , असं सणसणी उत्तर दिलं आहे.
साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना एका व्यक्तीने फोन करून सांगितले की, मी इकबाल कासकरचा माणूस आहे. अॅक्शन का रिअॅक्शन काय आहे, हे तुम्ही पाहून घ्या. मुस्लिम समाजाबद्दल वाईट बोलणे, मुस्लिम समाजाला टार्गेट करतात म्हणून तुम्हाला जीवे ठार मारणार, अशी धमकीच या व्यक्तीने दिली.साध्वी यांनी या मुस्लिम समाजाने कोणते चांगले काम केले आहे, असं विचारलं असता, तुम्हाला लवकरच सगळं काही कळेल.आम्हाला तुम्हाला सुचना द्यायची होती ती दिली आहे. आमचा माणूस तुम्हाला ठार मारेल तेव्हा तुम्हाला कळेल, असा इशाराच या व्यक्तीने दिला.फोनवरील हा संवाद साध्वी यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे.