सावंतवाडी- गेल्या काही तालुक्यातील वेत्ये – खंबालवाडी परिसरात चार पाच रानगव्याच्या कळपाचा मुक्त संचार दिसत असून हे गवे शेतकर्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत.तरी वनविभागाने या गव्याच्या कळपाचा बंदोबस्त करण्याची मागणी उपसरपंच गुणाजी गावडे यांनी केली आहे.
हा गव्याचा कळप दिवसाढवळ्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे.हा कळप गावात शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या कळपाचा रस्त्यावरील प्रवास नागरिकांच्या धोका उत्पन्न करणारा असून त्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी गावातील नागरिक शेखर खांबल यांनी केली असून हा कळपाचा मुक्त संचार त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये बंदिस्त केला आहे.