संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

सिंगापूरला जाऊ न देणे चुकीचे! केजरीवालांचे मोदींना नाराजी पत्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रात केजरीवाल यांनी सिंगापूरला जाण्याच्या परवानगीवरील बंदी चुकीची असल्याचे म्हटले आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांना देशहिताच्या कामासाठी जाण्यापासून रोखणे हे देशहिताच्या विरोधात असल्याची नाराजी त्यांनी या पात्रातून व्यक्त केली आहे. तेव्हा लवकरात लवकर परवानगी द्यावी असेही केजरीवाल यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, केंद्राकडून परवानगी मागून एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, परंतु अद्याप परवानगी मिळालेली नाही, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. अरविंद केजरीवाल १ऑगस्ट रोजी सिंगापूर येथे होणाऱ्या वर्ल्ड सिटी कॉन्फरन्समध्ये दिल्लीचे मॉडेल सादर करणार आहेत. सीएम केजरीवाल यांनी ७ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात एक पत्रही लिहिले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सीएम अरविंद केजरीवाल यांनी पीएम मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मला सिंगापूर सरकारने वर्ल्ड सिटी कॉन्फरन्समध्ये दिल्ली मॉडेल सादर करण्यासाठी बोलावले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या या परिषदेसाठी जगभरातील बडे नेते सिंगापूरमध्ये येत आहेत. दिल्ली त्याच्यासमोर सादर करणे हा भारतासाठी खूप अभिमानाचा क्षण असेल.या महत्त्वाच्या मंचाला भेट देण्यापासून रोखणे चुकीचे आहे. पत्रात पुढे लिहिले आहे की, मला अत्यंत दुःखाने सांगावे लागत आहे की, मला अद्याप सिंगापूरला जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मी दीड महिन्यापूर्वी ७ जून रोजी परवानगी मागणारे पत्र लिहिले होते. यावर अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. अशा प्रकारे एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशा महत्त्वाच्या कार्यक्रमाला येण्यापासून रोखणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पत्रात म्हटले आहे की, आज जगभरात दिल्ली मॉडेलची चर्चा होत आहे. २ वर्षांपूर्वी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आले होते, तेव्हा त्यांच्या पत्नी श्रीमती मिलेनिया ट्रम्प दिल्लीतील सरकारी शाळा पाहिल्यानंतर त्या देखील खूप प्रभावित झाल्या होत्या. सिंगापूरमध्ये दिल्ली मॉडेल सादर होणार आहे. केजरीवाल यांना सिंगापूरचे उच्चायुक्त सायमन वेंग यांनी १ जून रोजी बैठकीसाठी आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यास उत्सुक असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले असून, पंतप्रधानांकडे परवानगी मागितली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami