सिंघू सीमेवरील हत्या प्रकरण आरोपीला 7 दिवसांची कोठडी

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

नवी दिल्ली- काल सकाळी सिंघु सीमेवर अत्यंत निर्घृणपणे एका व्यक्तीची जमावाकडून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी निहंग शीख सरबजीत याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शुक्रवारी सकाळी हातपाय तोडलेल्या अवस्थेत एका व्यक्तीला रस्त्यावरच्या बॅरिकेडला बांधून ठेवल्याचे समोर आले होते. रक्तबंबाळ आणि अर्धनग्न अवस्थेत या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या व्यक्तीचे नाव लखबीर सिंह असल्याचे समोर आले होते. शीखांचा धर्मग्रंथ गुरुग्रंथ साहिबचा अपमान केल्याबद्दल त्याला शिक्षा देण्यात आल्याचे निहंग शीख म्हणत असल्याचे एका व्हायरल व्हिडिओतून समोर आले होते. कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलन स्थळाजवळच ही घटना घडली. हत्येतील मुख्य आरोपी निहंग शीख सरबजीत सिंह स्वत:हून काल सायंकाळी उशिरा लखबीरच्या हत्येची जबाबदारी स्वीकारत पोलिसांसमोर हजर झाला होता. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. आज सोनीपत पोलिसांनी त्याला जिल्हा न्यायालयासमोर हजर केले. यावेळी, न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. हरयाणा पोलिसांनी सरबजीत सिंहच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. हत्याकांडात वापरण्यात आलेल्या हत्यारांच्या तपासासाठी पोलिसांनी ही वेळ मागितली होती. परंतु, न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची कोठडी सुनावली. मुख्य आरोपी सरबजीत सिंहने चौकशीत आणखी चार आरोपींची माहिती दिली आहे. लवकरच या आरोपींनाही ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Close Bitnami banner
Bitnami