संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

सोनिया गांधींच्या नाकातून रक्तत्राव सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल केले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – कोरोनानंतर आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल केले आहे. १२ जूनला त्यांच्या नाकातून रक्त वाहत होते. त्यामुळे तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी काढलेल्या पत्रकात दिली आहे. सोनिया गांधींना नेमके कशासाठी रुग्णालयात दाखल केले याची माहिती त्यांनी पत्रकात दिली आहे.

सोनिया गांधी सध्या सर गंगाराम रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती जयराम रमेश यांनी पत्रकात दिली आहे. सोनिया गांधी यांच्या नाकातून अचानक रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. बुधवारी सकाळी याबाबतच्या एका प्रक्रियेतून त्यांना जावे लागले. सोनिया गांधींना २ जूनला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर केलेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांच्या श्वसन यंत्राच्या खालच्या भागात बुरशीचा संसर्ग झाल्याचे आढळले. त्यावर आणि कोविड पश्चात उद्भणाऱ्या समस्यांवर सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असे रमेश यांनी पत्रकात म्हटले आहे. ७५ वर्षांच्या सोनिया गांधी यांना २ जूनला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्या ८ जूनला नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी चौकशीला हजर राहू शकल्या नाहीत. त्यामुळे ईडीने आता त्यांना २३ जूनला चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू असल्यामुळे २३ जूनच्या ईडी चौकशीबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami