मुंबई- नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची गुरुवारी २१ जुलै रोजी ईडीकडून दोन तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली. त्यानंतर ईडीने सोनिया गांधी यांना सोमवारी २५ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र आता चौकशीसाठीच्या तारखेत बदल करण्यात आले असून मंगळवारी २६ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. तारीख बदलण्याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.
सोनिया गांधी ह्या नुकत्याच कोविडमधून बऱ्या झाल्यामुळे कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली होती,अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.यावेळी सोनिया गांधी यांचे वय आणि प्रकृती लक्षात घेऊन ईडीने कन्या प्रियांका गांधी यांना विशेष सूट म्हणून ईडी कार्यालयातील चौकशी कक्षापासून दूर आईसोबत थांबण्याची परवानगी दिली होती.