नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना संबंधित समस्यांमुळे त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 75 वर्षांच्या सोनिया गांधी यांना 2 जून रोजी कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले होते. कोविडनंतरच्या प्रकृतीच्या गुंतागुंतीमुळे 12 जून रोजी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
असून त्यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात 23 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीने सोनिया गांधी यांना नवीन समन्स जारी केले आहे. सोनियांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असला तरी चौकशीसाठी त्या ईडीसमोर हजर होतील का? याबद्दल साशंकता आहे. याआधी सोनिया गांधी यांना यापूर्वी 8 जून रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले होते.