मुंबई – लागोपाठ दोन दिवस घसरलेले सोन्याचे दर काल वाढले होते. त्यामुळे सोने खरेदीला काहीसा ब्रेक लागला, मात्र आता चिंता करू नका. कारण आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावात घसरण झाली. परंतु चांदी मात्र महागली.
आज गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार, २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ४६,७२० रुपये, तर २४ कॅरेटसाठी ५०,९७० रुपये आहे. तसेच आज चांदीच्या दरात वाढ झाली असून १० ग्रॅम चांदीचा दर ६२४ रुपये आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीत २४ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,९३० रुपये, मुंबईत ५१,९३० रुपये, चेन्नईत ५२,०६० रुपये, हैदराबादमध्ये ५१,९३० रुपये आणि कोलकातामध्ये ५१,९३० रुपये इतका आहे.
दरम्यान, सोने खरेदी करताना ग्राहकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ऍक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते. २४ कॅरेटवर ९९९, २३ कॅरेटवर ९५८, २२ कॅरेटवर ९१६, २१ कॅरेटवर ८७५ आणि १८ कॅरेटवर ७५० लिहिलेले असते. बहुतेक सोने २२ कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक १८ कॅरेट सोनेदेखील वापरतात. कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने अधिक शुद्ध असे म्हटले जाते.