सोमवारी रंगकर्मींचे राज्यभर सर्व पितृस्मृती महाआंदोलन

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई- देशात कोरोना महामारी सुरु झाल्यापासून रंगकर्मींचा रोजगार हिरावला गेला आहे. कोरोनामुळे बंद झालेले काम पुन्हा सुरु व्हावे यासाठी रंगकर्मींनी अनेकदा आंदोलने केली. अखेर रंगकर्मींनी 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभर केलेल्या आंदोलनाची दखल घेत सांस्कृतिक मंत्र्यांनी त्यांच्या मागण्यांना तत्वतः मान्यता दिली. मात्र त्या संबंधीचा लेखी, सरकारी आदेश अद्याप काढला गेलेला नाही. सर्व क्षेत्र टप्याटप्याने कार्यरत करण्यात आली. परंतु सांस्कृतिक क्षेत्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या विरोधात सोमवार, 27 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींंनी आपापल्या जिल्ह्यात ‘रंगकर्मी सर्व पितृस्मृती महाआंदोलन’ करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्रतर्फे देण्यात आली आहे.


रंगकर्मींंच्या मागण्यांसाठी 9 ऑगस्ट 2021 क्रांतीदिनी संपुर्ण महाराष्ट्रात आपण ‘जागर रंगकर्मींं’चा हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत सांस्कृतिक मंत्र्यांनी आपल्याला भेटीला बोलावले. आपल्या मागण्यांना तत्वतः मान्यता दिली. पण अद्याप त्या संबंधीचा लेखी, सरकारी आदेश काढला नाही. राज्यातील रंगकर्मींनी 30 ऑगस्ट 2021 रोजी नाट्यगृह आणि चित्रपटगृह सरकारने सुरु करावी यासाठी आपले दैवत असलेल्या ‘नटराजाची महाआरती’ हे आंदोलन केले. त्याची दखल घेऊन नाट्यगृह 5 नोव्हेंबरपासून चालू होतील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. पण मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय रंगकर्मींना मान्य नाही.
सांस्कृतिक खाते आम्हां रंगकर्मींसाठी काहीही करीत नाही अशी ठाम समजूत महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींची झाली आहे आणि यामुळेच रंगकर्मींची बाजू सरकारकडे न मांडणारे, रंगकर्मींच्या कामी न येणारे सांस्कृतिक खाते तात्काळ बंद करावे ही मागणी जोर धरु लागली आहे. सगळी क्षेत्र टप्याटप्याने कार्यरत करण्यात आली परंतु सांस्कृतिक क्षेत्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. रंगकर्मींच्या काही कलांना सादरीकरणासाठी तात्काळ परवानगी देऊन टप्याटप्याने इतर कलांनाही संमती देता येईल हा साधा विचार राज्यकर्त्यांच्या ध्यानीमनी नाही आणि तसा अभ्यासही नाही. तो विचार आणि अभ्यास आमच्या ज्या पितरांचा होता त्या कलाप्रेमी पितरांच्या स्मृती जागविण्यासाठी 21 सप्टेंबरपासून सुरु होणार्या पितृपक्ष पंधरवड्यातील, सोमवार, 27 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींंनी आपापल्या जिल्ह्यात ‘रंगकर्मी सर्व पितृस्मृती महाआंदोलन’ करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्रतर्फे देण्यात आली.

Close Bitnami banner
Bitnami