संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

सोलापूरच्या पेनूरजवळ भीषण अपघात डॉक्टर दांपत्यासह 6 ठार! 4 जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सोलापूर – मोहोळ तालुक्यातील पेनुर गावाजवळ युनोव्हा व कार यांच्या झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी डॉक्टरसह त्याची एक मुलगी, मयत डॉक्टरांच्याच नात्यातील अन्य तीन जण अशा एकूण सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
मोहोळ येथील मागील तीन पिढ्यांपासून वैद्यकिय व्यवसायामध्ये असलेल्या खान कुटुंयिातील डॉ. अफरीन खान (30) त्यांचे पती मुजाहीद ईमाम आतार (35 ), मुलगा अरमान मुजाहीद आतार (5), यांच्यासह डॉ. अफरीन खान यांचे भाऊ नातेवाईक कुंटयि कौंटुबिक कारणानिमित्त स्वताच्या गाडीने बाहेरगावी गेले होते. आज रविवारी ते आपल्या मोहोळ गावी परतत असताना पेनुरजवळील माळी पाटीजवळ मोहोळहुन पंढरपूरकडे निघालेल्या स्कॉर्पिओ गाडीने समोरासमोर जोराची धडक दिल्याने कारमधील डॉ. अफरीन खान त्यांचे पती मुजाहीद आतार, त्यांचा मुलगा अरमान यांच्यासह ईरफान नुरखॉ खान त्यांची पत्नी बेनझीर ईरफान खान, मुलगी अनाया ईरफान खान असे सहाजण जागीच ठार झाले. तर इतर चारजण गंभीर जखमी असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांना मोहोळ येथाल ग्रामीण रुग्णालयातमध्ये शवविच्छेदनासाठी आणले असून जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami