संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 17 August 2022

सोलापूर-गाणगापूर एसटी बसचा भीषण अपघात, ३५ प्रवासी जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सोलापूर – सोलापूर-गाणगापूर बसला अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात आज सकाळी १०.३०च्या सुमारास अपघात झाला. या बसमध्ये जवळपास ७० प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ३५ प्रवासी जखमी असून सर्वांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ४ ते ५ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते आहे. दरम्यान, अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात केवळ एक ते दोन डॉक्टर आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांनादेखील या ठिकाणी तात्काळ पाचारण करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-गाणगापूर बस पुलावरून जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अपघातातून जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. हा अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळ व पोलिसांकडून याबाबत माहिती घेतली आणि जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami