संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

स्वत:शीच लग्न करणारी क्षमा हनिमूनला निघाली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सुरत – गुजरातची क्षमा बिंदू स्वतःशीच लग्न करणार असल्याची घोषणा करून चर्चेत आली होती. तिने ८ जून रोजी बडोद्यातील तिच्या राहत्या घरी लग्न केले होते. क्षमा ही स्वतःशीच लग्न करणारी म्हणजेच ‘सोलोगॅमी’ विवाह करणारी पहिली भारतीय महिला आहे. तिच्या लग्नाला काहींनी समर्थन दिले होते, तर अनेकांनी याचा विरोध केला होता. दरम्यान, ती पुढच्या महिन्यात हनिमूनसाठी गोव्यात जाणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

क्षमा बिंदूने तिच्या गोव्याच्या सोलो हनिमूनबद्दल ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली आहे. यावेळी ती म्हणाली, इतर नववधूंप्रमाणे मीसुद्धा हनिमूनसाठी उत्सुक आहे. गोवा हे माझे ड्रीम डेस्टीनेशन असल्यामुळे ७ ऑगस्टला मी गोव्यात जाणार आहे. तिथले माझे सर्व खास क्षण माझ्या मोबाईलवर रेकॉर्ड करणार आहे. १० ऑगस्टला माझा वाढदिवसही तिथेच साजरा करणार आहे. याशिवाय मी माझ्या हनिमूनला जाईन, तेव्हा लोकांना कळेल की मी विवाहित आहे आणि ते मला माझ्या पतीबद्दल नक्कीच विचारतील. तेव्हा मला सोलोगॅमी आणि मी स्वतःशीच लग्न का केले, हे सर्व समजावून सांगण्याची संधी मिळेल, असे क्षमा म्हणाली. मित्र आणि कुटुंबियांनी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याचेही तिने सांगितले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami