संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

स्वाईन फ्लूमुळे राज्यात सात जणांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता राज्यामध्ये स्वाईन फ्लूचा संसर्ग वेगाने होत आहे. महाराष्ट्रात जुलै महिन्यात दोन आठवड्यांतच स्वाईन फ्लूच्या 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 10 जुलैला पालघरमध्ये स्वाईन फ्लूचा या वर्षातील पहिला बळी गेल्याचे माहिती समोर आली होती. जानेवारी महिन्यापासून आत्तापर्यंत स्वाईन फ्लूचे एकूण 142 रुग्ण राज्यात सापडले आहेत. स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

स्वाईन फ्लू हा एक संसर्गजन्य आजार असून ‘एचवनएनवन’ व्हायरसमुळे त्याची लागण होते. 2009 साली जागतिक आरोग्य संघटनेने हा रोग संसर्गजन्य असल्याचे जाहीर केले होते. गेल्या तीन वर्षांत मुंबईत ‘एचवनएनवन’ विषाणू (स्वाईन फ्लू) मुळे एकही मृत्यू झालेल नाही, मात्र 2022 या वर्षांत मुंबईत रुग्णांची संख्या सर्वात अधिक, 43 इतकी आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 1 जानेवारी 2022 ते 21 जुलै 2022 या कालावधीतील आढळलेल्या रुग्णांची माहिती समोर आली असून राज्यात 142 रुग्ण स्वाईन फ्लूने ग्रस्त आहेत. त्यापैकी मुंबईत सर्वाधिक 43 रुग्ण, पुण्यात 23 (मृत्यू 2), पालघर 22, नाशिक 17, नागपूर 14, कोल्हापूर 14 ( मृत्यू 3), ठाण्यात 7 ( मृत्यू 2) आणि कल्याण – डोंबिवलीत प्रत्येकी 2 रुग्ण आढळले आहेत. स्वाईन फ्लूने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

जुलै महिन्यात स्वाईन फ्लूचे 11 रुग्ण सापडले होते, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक योजना अमलात आणल्या जात आहेत, असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami