मालदीव – भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील दुराव्यामुळे त्यांच्यातील खेळ संबंधही थांबले आहेत.पाकिस्तानला तर भारतात खेळण्यास जाहीरपणे बंदी घालण्यात आली आहे.मात्र आता पाकिस्तानचे काही शरीरसौष्ठवपटू खेळाडू या दोन्ही देशातील खेळ संबंध सुधारण्याच्या भावनेतून आवाहन करताना दिसत आहेत.आमच्या खेळाडूंना भारताचे दरवाजे खुले करावेत.आम्हीही भारतीयांची मेहमाननवाझी करायला उतावीळ आहोत असे वक्तव्य पाकिस्तानचा स्टार शरीरसौष्ठवपटू सय्यद फझल याने व्यक्त केले आहे.
मालदीव येथे ५४ व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी पाकिस्तानचा सहा सदस्सीय संघ दाखल झाला आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.यावेळी पाकिस्तानचा शरीरसौष्ठव सय्यद फझल म्हणाला की,भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील शत्रुत्व हे राजकीय पातळीवरील आहे.मात्र आम्ही दोन्ही देशातील खेळाडू आमच्या देशाबाहेर आम्ही एकत्र संबंध ठेऊन असतो.आमच खेळणं,जेवणं,उठणं ,बसणं आणि एकमेकांना प्रोत्साहन देणं चालत असत. फझल असेही म्हणाला की,हमे मेहमाननवाझी का मौका दो और हमारे खिलाडीयोके लिए इंडीयाकेदरवाजे खोल दो. या दोन्ही देशातील राजकीय आणि सीमेवरील वाद असल्याने आम्हाला अनेक वर्षे झाले इच्छा असूनही भारताचा व्हिसा मिळत नाही.भारतातील चांगल्या मोठमोठ्या शरीरसौष्ठव स्पर्धांना आम्हाला मुकावे लागत आहे.दोन्ही देशांनी राजकीय शत्रुत्व बाजूला ठेऊन ही बंदी उठवली पाहिजे.खेळ संबंध सुरू झाले पाहिजेत.यातून दोन्ही देशांना फायदाच होणार आहे असेही मत सय्यद फझल याने मांडले आहे.