संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 23 May 2022

हरिद्वार धर्मसंसद प्रकरणी यती नरसिंहानंद गिरींना अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

हरिद्वार – हरिद्वार धर्मसंसद प्रक्षोभक भाषण प्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली. धर्मगुरू यती नरसिंहानंद गिरी यांना अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणात वसीम रिजवी उर्फ जितेंद्र नारायण त्यागी यांना अटक केली आहे. त्यानंतर यती नरसिंहानंद यांना अटक झाली. त्यामुळे तेथे तणाव पसरला आहे.

हरिद्वारच्या धर्मसंसदेत मुस्लिम विरोधी वक्तव्ये आणि चिथावणीखोर भाषणे झाली होती. त्यावरून देशभर वादळ उठले. सर्वोच्च न्यायालयानेही याची गंभीर दखल घेऊन या प्रकरणात कारवाई करण्याची सूचना उत्तराखंड सरकारला दिली. कारवाईबाबतचे प्रतिज्ञापत्र १० दिवसांत सादर करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर उत्तराखंड सरकारने या प्रकरणात वेगाने कारवाई सुरू केली. त्यात प्रथम वसीम रिजवी यांना अटक केली. त्यानंतर यती नरसिंहानंद यांनाही आता अटक झाल्यामुळे या कारवाईला वेग आल्याचे स्पष्ट होते. नरसिंहानंद गिरी यांच्या अटकेविरोधात त्यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली. त्यामुळे तिथे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami