गांधीनगर – पाटीदार समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी दमदार घोषणा करीत २५ ऑगस्ट २०१५ रोजी अहमदाबादला तुफान सभा घेऊन गुजरातच्या भाजपा सरकारला हादरे देणारा युवा नेता हार्दिक पटेल याने अखेर भाजपातच प्रवेश केला. कट्टर विरोधक असलेला भाजपा पक्ष हार्दिक पटेलचा मित्र झाला.
पाटीदार आंदोलनात हिंसाचार घडल्यानंतर हार्दिक पटेलला काही वर्षे गुजरातमधून तडीपार केले गेले. ही शिक्षा स्थगित झाल्यावर हार्दिकने पुढील तीन वर्ष काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. मात्र काँग्रेस पक्षाला विधायक असे कोणतेच काम करायचे नाही, असा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वाचे गौरव आहेत, असे म्हणत हार्दिक पटेलने भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांना भाजपात आणणे ही जबाबदारी त्याच्यावर टाकली आहे.