संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 14 August 2022

हार्बर लोकल बफरवर आदळून घसरली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक एकवर आज सकाळी विचित्र अपघात झाला. लोकल डेड एंड बफरवर आढळून तिचा डबा रुळावरून घसरला. त्यामुळे हार्बर रेल्वेची सेवा गर्दीच्यावेळी ३ तास विस्कळीत झाली. घसरलेला डबा रुळावर आणल्यानंतर हार्बरची सेवा पूर्ववत सुरू झाली. या सर्व प्रकाराचा प्रवाशांना फटका बसला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक एकवर सीएसएमटी-पनवेल लोकल होती. ती पनवेलला जाण्यासाठी सुटली तेव्हा पनवेलच्या दिशेने जाण्याऐवजी उलट मागे वेगाने गेली आणि डेड एंड बफरवर आदळली. त्यामुळे तिचा एक डबा रुळावरून घसरला. हा अपघात एवढा मोठा होता की, त्यामुळे प्लॅटफॉर्मवरच्या काही लाद्या उखडल्या. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या अपघातामुळे हार्बर रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. टिळक नगर ते कुर्ला दरम्यान ट्रेन रखडल्याने प्रवासी ट्रॅकवरून जात होते. सकाळी कामावर निघालेल्या चाकरमानींचे यामुळे हाल झाले. कार्यालयात जाण्यासाठी त्यांनी रिक्षा, टॅक्सी आणि बेस्ट बसकडे धाव घेतली. त्यामुळे बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली होती. वडाळा रेल्वे स्थानकाच्या बाहेर बेस्ट बस स्टॉपवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. ३ तासांच्या प्रयत्नानंतर घसरलेला डबा रुळावर आणल्यानंतर आणि ही लोकल कारशेडला रवाना झाल्यावर हार्बरची सेवा पूर्ववत सुरू झाली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami