संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

हे घाणेरडे राजकारण पटतेय का?
आदित्य ठाकरेंचा कोकणात सवाल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सावंतवाडी – शिवसेनेचे नेते आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा आज सावंतवाडी आणि कुडाळमध्ये पोहोचली होती. त्यांनी सर्वात प्रथम शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकरांच्या सावंतवाडी मतदारसंघात चौक सभा घेतली. राज्यात 2 जणांचे जम्बो मंत्रिमंडळ असून त्यात मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण हे कळतच नाही. या सरकारचे लक्ष महाराष्ट्रावर नाही, जनतेवर नाही, त्यांचे लक्ष फक्त घाणेरड्या राजकारणावर आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही असे घाणेरडे राजकारण बघितले नाही, हे घाणेरडे राजकारण पटतेय काय? असा सवाल आदित्य ठाकरे
यांनी विचारला.
आज सकाळी चिपी विमानतळावर येताच आदित्य ठाकरे यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. त्यानंतर सावंतवाडीच्या दिशेने कार्यकर्त्यांशी संवाद साधून चौक सभा घेतली. त्यांनी आपल्या सभेत सांगितले की, शिंदे आणि फडणवीस सरकारचे नाट्य आणखी एक महिन्याचे असून तुम्ही आज लिहून घ्या की, शिंदे सरकार कोसळणार, गद्दारी कधी महाराष्ट्र खपवून घेत नाही. पक्ष फोडा, गद्दारी करा ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. ज्या माणसाने तुम्हाला घडवले, तुम्हाला राजकीय ओळख दिली, सगळं काही दिले त्या माणसाच्या पाठित खंजीर खुपसण्यात आला, अशी महाराष्ट्राची ओळख झाली आहे. हे सरकार गद्दारांचे सरकार असून, सर्व जण बेईमान आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami