नवी दिल्ली – उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट यांच्यातील न्यायालयीन लढाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज त्यावर शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे ही लढाई आता लांबल्याने दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, हे प्रकरण संविधानिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे त्यामुळे त्यावर तातडीने सुनावणी होऊ शकत नाही. तसेच जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी होत नाही तोपर्यंत आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातला निर्णय घेऊ नये, असे न्यायालयाने सांगितले.
दरम्यान, शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेने १६ आमदारांना अपात्र करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानंतर झिरवळ यांनी या आमदारांना नोटिसा बजावल्या होत्या. शिवसेनेने अपात्र ठरवलले १६ आमदार जर न्यायालयाकडूनही अपात्र ठरवले गेले तर शिवसेनेच्या बाजूने निकाल लागेल. मात्र ही कायद्याची लढाई आता लांबल्याने दिसत आहे.