संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 17 August 2022

९९.९ टक्क्यांनी असमाधानी; विद्यार्थी पुन्हा देणार जेईई

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईच्या चिन्मय मुरजानी या विद्यार्थ्याला जेईई मेन २०२२ परीक्षेत ९९.९५६ टक्के मिळाले. परीक्षेच्या पहिल्या सत्रातील टॉपर्सपैकी तो एक ठरला. मात्र आश्चर्य म्हणजे चिन्मय त्याच्या गुणांवर समाधानी नाही, त्यामुळे त्याला आता पुन्हा एकदा जेईई द्यायची आहे. येत्या २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या जेईई मेनच्या दुसऱ्या सत्रात तो बसणार आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना चिन्मयने सांगितले, ‘या परीक्षेची तयारी करताना मी तपशीलवार नोट्स बनवल्या, सगळा अभ्यास वेळच्या वेळी केला, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि दर आठवड्याला दोन ते तीन मॉक टेस्ट दिल्या. याशिवाय कोचिंग इन्स्टिट्यूटच्या विशेष तासिकांनाही मी हजेरी लावली. मी आता जेईई मेन दुसऱ्या सत्राची परीक्षाही देईन, त्यामुळे मला माझे गुण वाढवण्यास मदत होईल.’

चिन्मयला अभियांत्रिक क्षेत्रात प्रचंड रस आहे. जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा पास करणे आणि देशातील टॉप आयआयटीमध्ये जागा मिळविणे हे त्याचे ध्येय आहे. मात्र त्यासाठी जेईई मेन परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवूनही त्याला पुन्हा एकदा परीक्षा द्यायची असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, चिन्मयचे वडील आर्किटेक्ट आणि आई गृहिणी आहे. त्याने सीबीएसई बोर्डाशी संलग्न असलेल्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधून दहावी, बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्याला दहावीत ९८ टक्के मिळाले होते, तर बारावीचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami