नवी दिल्ली – 100 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप झालेले शिवसेनेचे नेेते अर्जुन खोतकर यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अचानक भेट घेतली. या भेटीनंतर खोतकर हे शिंदे गटात गेल्याची जोरदार चर्चा झाली आहे. मात्र त्यांच्या भेटीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी खोतकरांवर 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर 24 जून रोजी ईडीने त्यांच्या जालना सहकारी साखर कारखान्यावर छापे टाकले होते. कारखान्याची जमीन, एक रेसिडेन्सियल फ्लॅट आणि एक बिल्डिंग आणि स्ट्रक्चर जप्त करण्यात आले. त्यांच्याशी संबंधित तब्बल 78 कोटी 38 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली होती. अशा परिस्थितीत भाजपच्या कृपेने मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंची आज दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात अर्जून खोतकरांनी भेट घेतली.
वैयक्तिक कामासाठी
दिल्लीला आलो-खोतकर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले की, मी वैयक्तिक कामासाठी दिल्लीला आलो होतो. लॉथम्स याठिकाणी अॅँगेज करायचे होते. माझ्यासोबत वकिलही होते. मी गेल्या आठवड्यातही येथे होते. आजही आलोय. योगायोगाने मुख्यमंत्र्यांची भेट झाली. भेट घेणे म्हणजे सामील होणे नाही.