नवी दिल्ली- मोदी सरकारने देशातील कोट्यावधी शेतकर्यांना मोठी दिलासा दिला आहे. एकूण 17 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2022-23 पीक वर्षासाठी पिकांचा एमएसपी 100 रुपयांनी वाढवून 2,040 रुपये प्रति क्विंटल केला तर इतर अनेक खरीप पिकांवरही एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेतला.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पेरणीच्या वेळी एमएसपीची माहिती घेतल्याने शेतकर्यांचे मनोबलही उंचावते आणि त्यांना पिकाला चांगला भाव मिळतो. यावेळी सर्व 14 खरीप पिके आणि त्यांच्या वाणांसह 17 पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली आहे. शेतकर्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.