डहाणू, प्रतिनिधी- डहाणू येथील, डहाणू बोर्डी राज्य मार्गावरील उपवन संरक्षक कार्यालया समोर भरधाव कार भिंतीच्या आडोशाला उभे असलेल्या डहाणू नगर परिषदेच्या दोघा सफाई कर्मचार्यांना चिरडल्याची घटना आज घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत सफाई कर्मचार्यांचा जागीच मृत्यू झाला.
आज सकाळी साडेआठच्या सुमारास डहाणू पारनाका जवळील उपवन संरक्षक कार्यालया समोर, डहाणू नगर परिषदेचे भरत कानजी राऊत (55) आणि वंकेश मंजी जोग (38) हे गटार स्वच्छतेचे काम करीत होते. त्यावेळी पाऊस असल्याने ते लगतच्या भिंतीच्या आडोशाला उभे असताना पांढर्या रंगाच्या एका कारवरील चालक अरहम कल्पेश शहाचा ताबा सुटल्याने ती कार दोन्ही सफाई कर्मचार्यांना चिरडून भिंतीवर जाऊन आदळली. या घटनेत दोघाही स्वच्छता कर्मचार्यांचा जागीच मृत्यू झाला. तर या कार अपघातात अरहम कल्पेश शहा (16) कारचालक सुस्थितीत असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कार अपघातात मृत्यू पावलेल्या डहाणू नगरपरिषदेच्या दोघा सफाई कामगारांचे मृतदेह, डहाणू उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डहाणू पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी दिली.