संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

3 वर्षांत देशातील 42 टक्के नागरिकांची सायबर फसवणूक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- डिजिटल व्यवहार झपाट्याने वाढत असताना त्यामध्ये होणार्‍या आर्थिक फसवणुकीच्या घटनाही देशात तेवढ्याच वेगाने वाढत आहेत. गेल्या 3 वर्षांत 42 टक्के नागरिकांना कोणत्या ना कोणत्या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. त्यातील 74 टक्के फसवणूक झालेल्यांना त्यांचे पैसे परत मिळालेले नाहीत. एका संस्थेने केलेल्या पाहणीत हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले. कोरोना काळात या व्यवहारांना मोठी चालना मिळाली. त्याबरोबरच सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकणार्‍यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. 3 वर्षांत 42 टक्के ग्राहकांना अशा आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागले. 11 हजार 65 लोकांचे सायबर फसवणुकीबाबत सर्वेक्षण केले.

त्यात 54 टक्के सायबर गुन्हेगारीचे शिकार ठरल्याचे आढळले. 38 टक्के जणांच्या कुटुंबात कोणाची तरी फसवणूक झाली. 4 टक्के लोकांनी आपल्याच कुटुंबातील एकाची आर्थिक फसवणूक झाल्याचे सांगितले. यात बँक खात्यातून फसवणूक झाल्याच्या सर्वाधिक घटना आहेत. एटीएम कार्डद्वारे 8, क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे 18, बँक खात्यातून 29, विम्यातून 6, मोबाईल पमधून 12, ई-कॉमर्समधून 24, आणि इतर प्रकारांमध्ये 21 नागरिकांची फसवणूक झाल्याचे आढळले. यातील केवळ 17 टक्के खातेदारांना पैसे परत मिळाले. इतर 74 टक्के नागरिक पैसे परत मिळवण्यात अपयशी ठरले. देशातील 301 जिल्ह्यांमधील लोकांचे या संस्थेने सर्वेक्षण केले. त्यात 43 टक्के पहिल्या श्रेणीतील शहरे होती. 27 टक्के दुसर्‍या आणि तिसर्‍या व चौथ्या श्रेणीच्या शहरांमधील अन्य नागरिकांचा त्यात समावेश आहे. यात 62 टक्के पुरुष आणि 38 टक्के महिला सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकल्याचे पाहणीत आढळले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami