संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

‘5 जी’साठी 1.5 लाख कोटींची बोली
लिलावात जिओ-एअरटेलमध्ये स्पर्धा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – गेल्या मंगळवारपासून सुरू झालेली 5 जी स्पेक्ट्रमची लिलाव प्रक्रिया सोमवारी संपली. या लिलाव प्रक्रियेत चार दूरसंचार कंपन्यांनी 1,50,173 कोटी रुपयांची बोली लावली. या लिलावात वेगवेगळ्या बँडमध्ये रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलमध्ये बोलीसाठी मोठी चढाओड झाली होती. पहिले 6 दिवस चाललेल्या या लिलावात 1,50,153 कोटी रुपयांची बोली लागली होती.
रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी डेटा नेटवर्क्स या कंपन्या 5 स्पेक्ट्रमच्या लिलावात सहभागी झाल्या होत्या. उत्तर प्रदेशाच्या ईस्ट सर्कलमधील लखनऊ, इलाहाबाद, वाराणसी, गोरखपुर और कानपूरच्या 1800 मेगाहर्ट्जसाठी लावण्यात आलेल्या लिलावात जिआ-भारतीय एअरटेलमध्ये जोरदार चढाओड पाहायला मिळाली. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, लिलावात ठेवलेल्या सर्व बँडसाठी चांगली स्पर्धा निर्माण झाली आहे. 2016 आणि 2021 मध्ये झालेल्या लिलावात या बँडसाठी कोणीही खरेदीदार नव्हता. मात्र, 5 स्पेक्ट्रम लिलावात लागलेली 1,50,173 कोटी रुपयांची बोली सरकारच्या स्वतःच्या अंदाजापेक्षा खूप जास्त आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami